Wednesday, 8 January 2025

१५०० कोटींची संपत्ती ते हजारो एकरची शेती, Walmik Karad च्या संपत्तीवरुन कोणते आरोप होतायत ?


वाल्मिक कराड भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या एक सर्वसाधारण पोर्‍या मुंडेंचाच बोट धरून बीड मधल्या परळीत नावारूपाला आला आणि आज राज्यभरात चर्चेचा विषय झाला अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्याच्यावर होणारे आरोप यामुळे वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात गाजतंय पण परळीत सुरुवातीपासूनच हे नाव कायम चर्चेत असायचं मग ते त्याच्या दहशतीमुळे असो किंवा त्यानं कमावलेल्या संपत्तीमुळे सध्या अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचे आरोप होत आहेत.

 गेल्या पाच वर्षात तर कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जातंय कराडला दोन महिन्यांपूर्वीच इडीन नोटीस पाठवली आहे कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी केलाय त्यामुळे कधी काळी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करणाऱ्या वाल्मिक कराडचं प्रस्थ किती वाढलं कराडच्या प्रॉपर्टी संबंधात नेमके काय आरोप होत आहेत

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड 22 दिवस फरार होता त्या काळात पोलीस प्रशासनानं त्याची बँक खाती गोठवली तसेच त्याच्या संपत्तीवरही टाच आणण्याचे आदेश काढले त्याचं सरेंडर स्क्रिप्टेड असल्याची टीका होत असली तरी आर्थिक कोंडी झाल्यानंतरच कराड सीआयडी ला शरण आला असं सांगितलं जातंय त्यामुळे कराडकडे नेमकी किती प्रॉपर्टी आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्ही कराडच्या संपत्तीबद्दल नेत्यांनी वेगवेगळे आरोप केलेत या आरोपांच्या अहवाल्यानंच कराडच्या संपत्ती बाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करू आष्टीचे आमदार सुरेश दसांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल काय आरोप केलेत ते आधी बघूयात मस्ता चौकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्यानंतर सुरेश दसांनी  सगळ्यात आधी कराडच्या संपत्तीवरून गंभीर आरोप केले होते 

टेंबुर्णी गावात एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झालाय शिरसाळा गावात 600 वीभट्ट्या आहेत त्यातल्या 300 वीडबट्ट्या या गायरान जागेवर आहेत आकाच्या नावावर या गावात 100 एकर जमीन आहे आकानं तिथं प्रचंड खर्च केलाय त्यांना आपल्याच जमिनीत 30-30 40 40 कोटींचे बंधारे बांधलेत फक्त पाच वर्षात इतकं कुठून येतं असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला होता धसांनी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्या व्यवहारातही कराडांचे मोठे लागेबंदे आहेत वाळू उपसा केमिकल ताडी हातभट्टीच्या दारू विक्रीचाही धंदा जोरात आहे दुसऱ्यांच्या जमिनीतून मुरूम काढून विक्री करायची आकाने एका गावात 50 एकर जमीन घेतली आहे इतरांच्याही जमिनीतून मुरूम काढलेत गायरान जमिनी लाटण्याचेही प्रकार घडलेत बाजार समितीचे गाळे बांधलेत त्याला तीन वर्ष होऊ नये त्याचं उद्घाटन होत नाही कारण ते सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधलेत असे आरोप धसांनी केले सुरेश धस यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट बाबत सुद्धा वाल्मिक कराडवर आरोप केलेत

 आनंद चॅरिटेबल ट्रस्टला मुख्य रस्त्याला लागून अडीच हेक्टर जमीन मिळाली त्यावर दवाखाने आणि वृद्धाश्रम सुरू करायचे होते मात्र काहीही होऊ दिलं जात नाही कारण आकाला त्या ट्रस्टचा अध्यक्ष करा आणखी कुणाला तरी त्या ट्रस्टचा सचिव करा अशी धमकी दिली जाते असंही धस यांनी म्हटलंय सुरेश दसांनी वाल्मिक कराडची संपत्ती तब्बल 1500 कोटींची असल्याचा आरोप केलाय तसंच या संपत्ती संदर्भात इडीची दोन महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडला नोटीस आल्याचंही त्यांनी सांगितलंय कराड साठी गेली पाच वर्ष म्हणजे चुकीचे दिवस असल्याचा चा आरोपही राजकीय वर्तुळातून होत आहे यातून मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप होत आहेत मुंडेंनी आपलं पालकमंत्रीपद  वाल्मिक कराडला भाड्याने दिलं होतं त्यातूनच पोलीस आणि प्रशासनाला हाताशी धरून कराडनं दहशत माजवून आर्थिक फायद्यासाठी अनेक कारनामे केल्याचा आरोप होतोय 


नसाच्या या आरोपांना खासदार बजरंग सोनवणे यांनीही एक प्रकारे दुजोराच दिलाय सुरेश दस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत त्यामुळे त्या अभ्यास करून बोलणारे नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले असतील त्यामुळे आता शासनानं आणि पोलीस यंत्रणेनं या गोष्टी तपासल्या पाहिजेत असं सोनवणे म्हणालेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे पार्टनरशिप मध्ये काही व्यवसाय असल्याचे आरोप झालेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलेत दमानिया यांनी मुंडे आणि कराड या दोघांची एकत्रितपणे 88 एकर जमीन असल्याचे आरोप काही कागदपत्र दाखवत केले होते त्याबाबत दमानिया म्हणाल्या धनंजय मुंडे आणि कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे मिळालेत त्यांची कंपनी एकत्र जमीन एकत्र आहे हे जगमित्र शुगरच्या सहा सातबारांच्या कागदपत्रातून स्पष्ट होतं तर आवाड यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्विसेस कंपनीच्या संचालकांच्या नावांची माहिती दिली आहे  त्यात या कंपनीचे संचालक म्हणून वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे राजेंद्र घनवाट यांची नाव आहेत सुरेश धसांनी कराड सह मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप केलेत 

धनंजय मुंडे यांनी हावरटपणे राजकारण केलंय धनंजय मुंडे यांनी वाळू आणि राखेतून पैसा कमावलाय तसंच घरकुलांसाठी त्यांनी दहा दहा हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप धसांनी केला आहे या सगळ्या आरोपांमुळे कराडनं मुंड्यांच्या मदतीने आपली संपत्ती वाढवल्याच्या आरोपाला बळ मिळत असल्याची चर्चा आहे अंजली दमानिया यांनी कराडचे अनेक बार असल्याचा आरोप सुद्धा केलाय  याबाबत दमानिया म्हणाल्या कराडच्या बार बाबत माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती मागितली मात्र त्यांच्या मालकांची नाव समजली नाहीत मात्र एक गोपनीय पत्र मला आलय त्या पत्रातून सांगितलंय की वाल्मिक कराडची केज वडवणी बीड आणि परळी इथं वाईनची चार ते पाच दुकान आहेत त्या प्रत्येक वाईन दुकानाचा सध्याचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे तसंच त्यानं केज इथे एक कोटी 69 लाखांना जमीन घेतली आहे मात्र त्यासाठी तीन दिवसातच परवानगी दिली गेली 


सातबारा 15 दिवसानंतर होतो मग सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याबाबत बाबत आपण मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती  दिल्याचेही दमान यांनी सांगितलंय वाल्मिक कराडनं परळी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून सर्वात जास्त माया कमावल्याचा आरोप होतोय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला पुरवण्यात येणार मनुष्यबळाचा कॉन्ट्रॅक्ट कोळसा वाहतुकीचं सर्व कॉन्ट्रॅक्ट वाल्मिक कराड किंवा त्याच्याशी संबंधित लोकांकडेच असल्याचा आरोप होतोय तसंच या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेवरही कराडनं कब्जा केलाय ही राख बांधकाम व्यवसायाला लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी आणि सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर वापरली जाते कंपनीतून दरवर्षी कमीत कमी हजार कोटींची राख बाहेर पडते बाजारातली डिमांड ओळखून आपल्या दहशतीच्या जोरावर हजारो कोटींची ही राख कराड फुकटात उचलतो त्यासाठी त्याचे 300 पेक्षा जास्त टिप्पर रस्त्यावर धावत असल्याचा आरोपही होत आहे दरम्यान ही राख उचलण्यासाठी 17 कंपन्यांना परवानगी दिली होती मात्र त्यांना राख उचलण्यासाठी फिरकू ही दिलं जात नाही तसंच या प्रकल्पातल्या स्क्रॅप वरही कराडचाच दावा असतो

 यासह जिल्ह्यातल्या वाळू वाहतुकीवरही कराडचा दबदबा असल्याचं बोललं जातंय त्यातूनच वाल्मिक कराड गेल्या काही वर्षात आर्थिक दृष्ट्या गब्बर झाल्याचा आरोप होतोय जमीन व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा वाल्मिक कराडकडे हजारो एकर शेती असल्याचा आरोप होतोय याबाबत कराडची आमच्या गावात 100 एकर 150 एकर जमीन आहे असं लोक मला सांगतात असं धसांनी म्हणलंय तसंच कराड आणि मुंडे यांची एकत्रित ही जमीन असल्याचे काही पुरावे अंजली दमान यांनी दिलेत यासह कराडच्या जमिनीबाबत एक यादी व्हायरल होती त्यानुसार सोलापूर मधल्या बारशीत 45 एकर सोनपेठ तालुक्यात 95 एकर तिथेच 20 एकरावर क्रशर माजलगाव मध्ये 45 ते 50 एकर मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर तर पुण्यातल्या मगरपट्टा भागात मोठ्या इमारतीचा संपूर्ण एक फ्लोर कराडच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचं सांगितलं जातंय बीडमध्ये वाल्मिक कराडची ओळख ही प्रति धनंजय मुंडे अशीच आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड आता अटकेत आहे 

अवादा पवनचक्की कंपनीकडं दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून कराडवर गुन्हा दाखल आहे सध्या तो पोलीस कोठडीत आहे मात्र कराड हा मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभागी असल्याचा आरोप होतोय एकीकडं राजकीय धुराळा उडत असला तरी दुसरीकडं बीडमधली गुन्हेगारी कशी बोकळत गेली याची चर्चा होते गुन्हेगारीतून अर्थकारण वाढवायचं त्यातून सत्ता ताब्यात घ्यायची या सत्तेतून गुन्हेगारांना राजाश्रय द्यायचा त्यातून पुन्हा अर्थकारणात ला बळ आणि पुन्हा सत्ता असं काहीस विचित्र चक्र बीडमध्ये सुरू असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होतोय या सगळ्याच्या केंद्रस्थानी वाल्मिक कराड आहे अशी चर्चा सुरू आहे एकंदरीतच वाल्मिक कराडच्या संपत्ती बाबत वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळे दावे केलेत पण अधिकृत रित्या वाल्मिक कराडची संपत्ती अजून पुढे आलेली नाही त्यामुळे कराडच्या संपत्ती बाबत पोलीस किंवा सरकार काही सांगत नाही तोपर्यंत त्याची नेमकी संपत्ती पुढे येणार नाही हे ही खरं 


१५०० कोटींची संपत्ती ते हजारो एकरची शेती, Walmik Karad च्या संपत्तीवरुन कोणते आरोप होतायत ?

वाल्मिक कराड भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणाऱ्या एक सर्वसाधारण पोर्‍या मुंडेंचाच बोट धरून बीड मधल्या परळीत नावारूपाल...